रिसोड नगर परिषदेच्यावतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 04:35 PM2019-06-30T16:35:35+5:302019-06-30T16:35:50+5:30

रिसोड (वाशिम) : श्री सखाराम महाराज विद्यालय लोणी येथे शनिवारी आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमनविषयक कार्यशाळा पार पडली.

Disaster Management Lessons for Students by Risod Municipality | रिसोड नगर परिषदेच्यावतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

रिसोड नगर परिषदेच्यावतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : श्री सखाराम महाराज विद्यालय लोणी येथे शनिवारी आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमनविषयक कार्यशाळा पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कल्याण जोशी होते. मुख्य मार्गदर्शक म्हणुन रिसोड नगर परिषदचे अग्निशमक स्थानक पर्यवेक्षक  गजानन गोरे तर प्रमुख अतिथी म्हणून जयंत वसमतकर, स्काऊट शिक्षक बबन आघाव होते. श्री सखाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गजानन गोरे यांनी विद्यार्थ्यांना आग प्रतिबंध याविषयी माहिती दिली. ज्वलनशील पदार्थ, आॅक्सिजन, उष्णता या तिघांचा त्रिकोण झाल्यानंतर व योग्य ते प्रमाण झाल्यानंतर आग लागते, असे सांगून स्थायू, द्रव, वायू आणि धातू या चार प्रकारात आग लागत, अशी माहिती दिली. आगीवर नियंत्रण कसे मिळवावे हे प्रात्यक्षिकद्वारे त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर करावयाची मदत यासंदर्भातही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. दीपक जोशी यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Disaster Management Lessons for Students by Risod Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.