आपत्ती व्यवस्थापन आठवड्यांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 02:37 PM2018-10-12T14:37:56+5:302018-10-12T14:39:23+5:30

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आठवडा साजरा केला जात असून या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

Disaster Management Lessons Under Disaster Management Week | आपत्ती व्यवस्थापन आठवड्यांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

आपत्ती व्यवस्थापन आठवड्यांतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार राज्य आणि जिल्हास्तरावर १३ आॅक्टोंबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ११ ते १८ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आठवडा साजरा केला जात असून या अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन आठवडा कालावधीत जिल्ह्यातील शाळांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच मोबाईल व्हॅन, पथनाट्य, प्रदर्शन, आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम (मॉक ड्रील), सभा, मुद्रित साहित्य, बॅनर, डॉक्युमेंटरी, चित्रफित इत्यादी माध्यमातून जनजागृती आणि शासनाचे आपत्ती व्यवस्थापन धोरण तसेच क्षमता बांधणीचे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे हिंगे यांनी सांगितले. नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तीपासून बचाव करणे तसेच मानवनिर्मित आपत्ती उद्भवू नये म्हणून घ्यावयाची दक्षता यासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. 

याला म्हणतात आपत्ती व्यवस्थापन
आपत्तीपासून निर्माण झालेल्या संकटाला प्रतिबंध करणे, या संकटांचा धोका कमी करणे, आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी क्षमता वाढवणे आणि त्याला तोंड देण्यासाठी सुसज्जता वाढवणे, आपत्तीच्या घटनांमध्ये योग्य तो शीघ्र प्रतिसाद देणे, आपत्तीचे गांभीर्य आणि परिणाम ओळखणे, आपत्तीच्या घटनांमध्ये बाधितांसाठी तातडीने बचाव कार्य करून मदत देणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासह पडलेल्या बांधकामांची पुनर्रचना करणे' यासाठी सततच्या व एकत्रित प्रक्रियेसाठी नियोजन व आयोजन करून आणि समन्वय साधत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याला आपत्ती व्यवस्थापन म्हटले जाते.

Web Title: Disaster Management Lessons Under Disaster Management Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.