वाशिममध्ये विद्यार्थ्यांची आपत्ती व्यवस्थापन रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:28 PM2017-10-12T13:28:41+5:302017-10-12T13:30:19+5:30
स्थानिक तुळशिराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन रॅलीत उत्स्फुर्त सहभाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जाधव महाविद्यालयाचा उत्स्फुर्त सहभाग : आपत्तीवर मात कशी करायची यावर जनजागृती
वाशिम : स्थानिक तुळशिराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाचा आपत्ती व्यवस्थापन रॅलीत उत्स्फुर्त सहभाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ते पाटणी चौक , आंबेडकर चौक, बसस्टँड परत जिल्हाधिकारी कार्यालय रॅलीची सांगता झाली. बाळासाहेब बोराडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाशिम यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन पार पाडण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.के.गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डी.एम.ढवारे यांनी रासेयो स्वयंसेवकांसमवेत रॅलीमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोदंविला.
तसेच महेश नेतनस्कर, हरिष घोंगडे, अनिल दरने, विक्की पवार, हिमांशु चौधरी, राजकुमार गुडदे, आकाश गायकवाड, शाम काकडे, सचिन पठाडे, कचवे, पवन सिरसाट, अजय जवकर, सुभाष बाजड, अतुल इंगळे, अक्षय कालापाड, रविंद्र भालेराव इत्यादी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. तसेच विद्याथीृ मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी होते. आपत्ती व्यवस्थापन रॅलीच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी वाशिमकरांना आपत्तींना क से सामोरे जायचे आपत्तीवर मात कशी करायची याविषयी जाणिव जागृती घडवुन आणण्याचे कार्य केले.