व्यसनमुक्ती केंद्राची मान्यता रद्द करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:19 AM2017-10-06T02:19:37+5:302017-10-06T02:20:00+5:30

वाशिम: जोतिबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड अंतर्गत शहरातील आययूडीपी कॉलनी येथे सुरू असलेल्या जोतिबा फुले सेवा ट्रस्ट या केंद्र सरकारद्वारा अनुदानित व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, संस्थेतील या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित संस्थाचालक व सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपाच्यावतीने देण्यात आले होते.

DISCLAIMER OF DISCUSSION CENTER! | व्यसनमुक्ती केंद्राची मान्यता रद्द करा!

व्यसनमुक्ती केंद्राची मान्यता रद्द करा!

googlenewsNext
ठळक मुद्देजोतिबा फुले सेवा ट्रस्ट व्यसनमुक्ती कागदावरचसमाजकल्याण आयुक्तांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जोतिबा फुले सेवा ट्रस्ट नांदेड अंतर्गत शहरातील आययूडीपी कॉलनी येथे सुरू असलेल्या जोतिबा फुले सेवा ट्रस्ट या केंद्र सरकारद्वारा अनुदानित व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, संस्थेतील या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित संस्थाचालक व सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपाच्यावतीने देण्यात आले होते. यासंदर्भात २४ सप्टेंबर रोजी लोकमतच्यावतीने वृत्त प्रकाशित केल्याबरोबर केंद्राने वाशिमातील गाशा गुंडाळला असल्या संदर्भात २६ सप्टेंबर रेाजी वृत्त प्रकाशित केले. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी यांनी पाहणी करून आढळलेल्या बाबीवरून आयुक्त समाज कल्याण म.रा. पुणे यांना पत्र पाठवून जोतिबा फुले सेवा ट्रस्ट नांदेडद्वारा संचालित व्यसनमुक्ती केंद्र वाशिमची मान्यता रद्द करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.
प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण विभाग, अमरावतीमार्फत आयुक्त समाज कल्याण म.रा. पुणे यांना जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी यांनी पाठविलेल्या पत्रात नमूद केले की,  जोतिबा फुले  सेवा ट्रस्ट नांदेड र.जी.महा.२१३/९३ नांदेड एफ  २८५४ नांदेडद्वारा संचालित व्यसनमुक्ती  केंद्र वाशिम हा केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत सन २00१ - 0२ एकूण व्यसनमुक्ती कार्यरत आहे. सदर संस्था केंद्र शासनाकडून व्यसनमुक्ती कार्यासाठी नियमित अनुदान प्राप्त करीत  असून, सन २0१५ -१६ मध्ये रु. १८,९९,१८९0 व सन २0१६ -१७ मध्ये रु.९,४९,५९0 इतके अनुदान प्राप्त झाले आहे. सदर संस्थेबाबत धनंजय मोहनराव हेंद्रे शहराध्यक्ष भाजपा वाशिम  यांच्याकडून सदर संस्था बंद असल्याबाबत तक्रार प्राप्त असून त्या अनुषंगाने २९ सप्टेंबर २0१७ रोजी दुपारी लखन मलिक आमदार वाशिम व मंगरुळपीर, यांच्या कक्षात  आयोजित  बैठकीत आमदार यांनी सदर संस्थ नियमानुसार कार्य करीत नसून, तिची मान्यता रद्द करण्यात यावी, सदर संस्थेला दिलेले अनुदान वसूल करण्यात यावे व संस्थाचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहे. 
त्यानुसार सदर व्यसनमुक्ती केंद्राला केंद्र जोतिबा फुले सेवा ट्रस्ट नांदेडद्वारा संचालित  व्यसनमुक्ती केंद्र वाशिमला २७ सप्टेंबर २0१७ रोजी दुपारी वाजता भेट दिली असता केंद्राचे मुख्य गेट व  दरवाजे यांना कुलूप लावले असून केंद्राची इमारत बंद स्थितीत आढळून आली तसेच केंद्राच्या आजूबाजूच्या रहिवाशांना सदर केंद्राबाबत विचारता केली असता सदरचे केंद्र बंद असल्याचे त्यांनी सांगितले. 
सदरचे व्यसनमुक्ती केंद्र शासनाकडून व्यसनमुक्ती कार्य करण्यासाठी नियमित अनुदान प्राप्त करीत असूनदेखील व्यसनमुक्ती  केंद्र बंद ठेवणे ही अतिशय गंभीर बाब असून, त्याबाबत संस्थेस करणे  दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे; परंतु सदर व्यसनमुक्ती  केंद्र हे बंद स्थितीत असल्याने सदर व्यसनमुक्ती केंद्राची मान्यता रद्द करून संस्थेस या समोर कोणतेही अनुदान वितरित करण्यात येऊ नये असे या कार्यालयाद्वारे प्रास्तावित करण्यात येत आहे.  तसेच संदर्भीय बैठकीत आमदार यांनी  निर्देश दिल्याप्रमाणे सदर संस्थेस देण्यात आलेले अनुदान वसूल करता येईल किंवा कसे, सदर संस्थाचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करता येईल किंवा कसे, याबाबत आपल्या स्तरावरून योग्य मार्गदर्शन करण्याची मागणीही पत्रातून करण्यात आली आहे.

Web Title: DISCLAIMER OF DISCUSSION CENTER!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.