काजळेश्वर येथे प्रवचन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:30+5:302021-02-08T04:35:30+5:30

काजळेश्वर येथे दरवर्षी श्रीसंत निवृत्ती महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यानिमित्त सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम गावकऱ्यांच्या सहकार्यातून पार ...

Discourse program at Kajleshwar | काजळेश्वर येथे प्रवचन कार्यक्रम

काजळेश्वर येथे प्रवचन कार्यक्रम

googlenewsNext

काजळेश्वर येथे दरवर्षी श्रीसंत निवृत्ती महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यानिमित्त सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम गावकऱ्यांच्या सहकार्यातून पार पडतात. यंदा या पुण्यतिथी साेहळ्याला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली. त्यात शरद महाराज गोरले यांच्या मधुर वाणीतून २.३० ते ४ .३० दरम्यान प्रवचनाचा कार्यक्रम पार पडत आहे. हा कार्यक्रम ९ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्याशिवाय दररोज रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होत असून, भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संदीप उपाध्ये यांनी केले आहे.

-----------

ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

काजळेश्वर: ग्रामीण भागांत पसरत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेत काजळेश्वर येथील आरोग्य उपकेंद्राकडून डॉ. प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

----------

शेतशिवारात नीलगायींचा धुडगूस

काजळेश्वर : परिसरात बहरलेल्या रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांत नीलगायींचे कळप धुडगूस घालून पिकांचे नुकसान करीत आहेत. वन विभागाने या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी शनिवारी केली.

Web Title: Discourse program at Kajleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.