तूर खरेदी सुरु करण्याबाबत जिल्हाधिकाºयांशी चर्चा
By admin | Published: May 5, 2017 07:27 PM2017-05-05T19:27:01+5:302017-05-05T19:27:01+5:30
तूर खरेदी तात्काळ सुरु करावी यासह विविध विषयांवर शिव संग्राम जिल्हाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी जिल्हाअधिकारी यांच्याशी चर्चा केली.
वाशीम : तूर खरेदी तात्काळ सुरु करावी यासह विविध विषयांवर शिव संग्राम जिल्हाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी जिल्हाअधिकारी यांच्याशी चर्चा केली.
नाफेडची तूर खरेदी बंद झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . अजूनही शेतकरांच्या घरात हजारो क्विंटल तूर पडून आहे . तूर खरेदी तात्काळ सुरु करावी या मुख्य मागणीसह मालेगाव न.प. सदस्य चंदु जाधव यांनी १ मे पासुन मालेगाव न.प. मधील भ्रष्टाचारा विरोधात आमरण उपोषण सुरू केले होते. त्या सर्व विषयाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचं पत्र या वेळी चंदु जाधव यांना देवुन त्यांचे उपोषण मागे घेण्यात आले. तसेच रिसोड तालुक्यातील अलाहाबाद बँकेने २०१४ मध्ये शेतकयार्ची फसवणुक करून विम्याचे पैसे विमा कंपनी कडे भरलेच नव्हते. सदर प्रकरणी वंचित पाचशेच्यावर शेतकयार्ना न्याय मिळानार आहे. तर नागठाणा ता. वाशिम येथील सुशिक्षित बेरोजगार सोंळके हे मुद्रा योजनेतुन लोन मिळावे म्हणुन उपोषणाला बसले होते त्या संदर्भात लीड बँकेचे मॅनेजर नगराळे यांच्याशी चर्चा करून कार्यवाहीचे पत्र अलाहाबाद बँक शाखा वाशिम ला देणयात आले असून याची चौकशीची मागणी त्यांनी चर्चेदरम्यान केली.
या वेळी जिल्हाअध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, शामभाउ काबरा, उत्तम आरू, संगीता मार्गे, मालेगाव तालुका अध्यक्ष रामेशवर आवचार, संतोष सुर्वे, स्वपनील वाघ,चरण गोटे, अमोल सोनोने, संतोष सुरडकर, महेश इंगळे, माहादेव जाधव, आकाश चव्हाण सर्व शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.