जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत गणेशोत्सवाबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:09 AM2017-08-17T01:09:01+5:302017-08-17T01:11:36+5:30
वाशिम : गणेशोत्सव साजरा करताना यावर्षी सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मातीपासून बनविण्यात आलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. गणेशोत्सव व बकरी ईदनिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय महसूल अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपाधीक्षक घुगे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांचे प्रभारी, शांतता समितीचे सदस्य व गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविण्यात आलेल्या जास्त उंचीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर पीओपी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत नाही. यंदा आतापर्यंत अतिशय कमी पाऊस झाल्याने शहरातील तलावांमध्ये अतिशय कमी पाणीसाठा आहे. त्यासाठी कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येऊन मातीपासून बनलेल्या कमी उंचीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याबाबत निर्णय घ्यावा अथवा जास्त उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास तिचे विसर्जन न करता केवळ छोट्या आकाराच्या स्थापना मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकार्यांनी यावेळी केले.