कृषी व्यावसायिक संघाच्या समस्यांवर  कृषीमंत्र्यांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 02:14 PM2017-10-08T14:14:29+5:302017-10-08T14:14:41+5:30

Discussion with the Agriculture Minister on the issues of the Agriculture Professional Association | कृषी व्यावसायिक संघाच्या समस्यांवर  कृषीमंत्र्यांशी चर्चा

कृषी व्यावसायिक संघाच्या समस्यांवर  कृषीमंत्र्यांशी चर्चा

Next

वाशिम : सद्यस्थितीत कृषी विभागाव्दारे कायदेशिर कारवाईचा बडगा उगारुन कृषी व्यावसायिकांचे परवाने निलंबन, रद्द करणे यासह कारवाई केल्या जात आहे.यामुळे सर्व विक्रेते संभ्रमात असून विचलित झाले आहे. याबाबत आपण संघटनेला सहकार्य करावे या मागणीसह विविध विषयावर जिल्हा कृषी व्यावसायिक संघाच्या पदाधिकाºयांनी कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर ायांच्याशी ८ आॅक्टोबर रोजी चर्चा केली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले

जिल्हा कृषी व्यावसायिक संघाच्यावतिने देण्यात आलेल्या निवेदनात व चर्चेत अनेक मुद्यांवर लक्ष केंद्रीत केलेत. सर्व कृषी व्यावसायिक कृषी आयुक्तालयामार्फत परवानगी असलेल्या उत्पादनाची विक्री करतात. शेतकरी बंधुंच्या मागणीनुसार रितसर बील देवून किटकनाशकाची विक्री करतात. तसेच शेतकरी बांधवांना योग्य ती माहिती सुध्दा पुरवितात. परंतु यानंतर त्यांच्या वापरावरा नियंत्रण राहू शकत नाही. संघटनेचे सर्व सदस्य कृषी विभागाला पूर्ण सहकार्य करतांना दिसून येतात. तसेच ज्या शेतकरी बांधवांवर विक्रेत्यांचा व्यवसाय अवलंबून आहे त्या बांधवाप्रती विक्रेतंची बांधलकी असतांना कृषी विभागाव्दारे कायदेशिर कारवाईचा बडगा उगारुन परवाने निलंबन, रद्द तसेच पोलीस एफ.आय.आरची कार्यवाही सुरु झाली आहे. या संवेदनशिल व गंभीर प्रकरणाचा पूर्ण दोष कृषी केंद्र संचालकावर लादल्या जात आहे. त्यामुळे सर्व विक्रेते संभ्रमात असून विचलित झाले आहे. यवतमाळ जिल्हयामध्येही भितीचे वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण बाबींचा विचार करुन आपण आमच्या संघटनेला सहकार्य करण्यासंदर्भात कृषी मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. तसेच या आशयाचे निवेदनही त्यांना देण्यात आलेत.  तसेच कृषी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेला सहकार्य करावे अन्यथा संपूर्ण जिल्हयातील किटकनाशक परवाने कार्यालयात परत करण्यात येईल याशिवाय दुसरा विकल्प नसल्याचेही म्हटले आहे.  या निवेदनावर वाशिम जिल्हा कृषी व्यावसायिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील (दहात्रे),  गजानन गावंडे, ओंकार आलोकार, विनय बियाणी, संतोष सुर्वे, सुनिल झांजरी यांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Discussion with the Agriculture Minister on the issues of the Agriculture Professional Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.