वीज समस्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:19 AM2021-01-24T04:19:42+5:302021-01-24T04:19:42+5:30
माेहजा येथे शेतीच्या सिंचनासाठी वीजजोडणी नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, शिवाय अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, नागरिक त्रस्त आहेत. ...
माेहजा येथे शेतीच्या सिंचनासाठी वीजजोडणी नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, शिवाय अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, नागरिक त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या व गावकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरपंच घनश्याम मापारी यांनी पुढाकार घेऊन, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या समस्या साेडविण्याचा प्रयत्न केला. २३ जानेवारी राेजी मोहजा ईगोले येथील ग्रामपंचायत कार्यालयात महावितरणचे कनिष्ठ अभियंता विस्मीन हेडाऊ याच्यासोबतच बैठकीचे आयोजन करून गावात असलेल्या समस्येसंदर्भात चर्चा केली. यावेळी सतीश ईगोले, भागवत कालापाड, मारोती ईगोले, विजय हुंबे, श्रीराम ईगोले, गजानन शिंदे, संजय पाटील, दत्तराव जाधव, नितीन ईगोले, पंजाब शिंदे यांच्यासह महावितरण कर्मचाऱ्यांसह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.