वाशिम शहरातील गुंठेवारीच्या प्रश्नावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:28 AM2021-06-17T04:28:12+5:302021-06-17T04:28:12+5:30
बैठकीला मुख्याधिकारी दीपक मोरे, नगर रचना अधिकारी रश्मी हलगे, सहाय्यक अधिकारी अविनाश देशमुख यांच्यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. ...
बैठकीला मुख्याधिकारी दीपक मोरे, नगर रचना अधिकारी रश्मी हलगे, सहाय्यक अधिकारी अविनाश देशमुख यांच्यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आमदार मलिक यांनी गुंठेवारीच्या प्रश्नाला हात घालत ही प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. गुंठेवारीसंबंधीचा ठराव घेऊन चार महिने होऊनही कार्यवाही झालेली नाही. यामुळे नागरिकांना त्रास होत असून शहराचा विकासही खुंटला आहे, असे आमदार मलिक यांनी यावेळी सांगितले. त्यावर मुख्याधिकारी मोरे यांनी गुंठेवारी खरेदी सुरू करण्यात आली असून नागरिकांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार मलिक यांनी पाटणी चौक ते अकोला नाका रस्त्यावरील रहदारीस अडथळा निर्माण करणारे विजेचे खांब इतरत्र हलविण्याची सूचना केली. सदर खांब येत्या १० दिवसात हटविण्यात येतील, अशी ग्वाही गणेशपुरे यांनी दिली, याप्रसंगी इतरही महत्वाच्या समस्यांवर चर्चा झाली. बैठकीला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, न.प. उपाध्यक्ष बापू ठाकूर, बांधकाम सभापती गौतम सोनुने, नगरसेवक उत्तम पोटफोडे, अनिल ताजणे, बाळू मुरकुटे, भीम जिवनाणी, अब्दुल चौधरी, नीलेश जैस्वाल उपस्थित होते.