मालेगाव येथे होणार शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 03:34 PM2018-09-28T15:34:32+5:302018-09-28T15:35:05+5:30
मालेगाव : शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर विचारविनिमय होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा मालेगावच्यावतीने ३० सप्टेंबर रोजी मालेगाव येथे तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर विचारविनिमय होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा मालेगावच्यावतीने ३० सप्टेंबर रोजी मालेगाव येथे तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे पदाधिकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शिक्षण क्षेत्रामधे शेकडो संघटना व स्वतंत्र आमदार कार्यरत असतांनाही शिक्षण क्षेत्रातील समस्या का संपत नाहीत, या विषयावर चर्चा होणार आहे तसेच संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कर्मचारी व कामगारांना त्यांच्या समस्यांची जाणीव करून देणे व त्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच ‘ट्रेड युनियन’ निर्माण करण्याची आवश्यकता का आहे, या विषयावर सुद्धा चर्चा होणार आहे. शिबिराच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे विदर्भ प्रभारी प्रा. पी. एस. आठवले राहणार असुन उदघाटक म्हणून संस्थाचालक अनिल गवळी राहतील. प्रमुख वक्ते प्रा. भरत आव्हाळे, प्राचार्य प्रकाश कापुरे व वाशिम जिल्हाध्यक्ष अरुण इंगळे हे राहणार आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी गौतम खंडारे आणि सर्व केंद्रप्रमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्राचार्य वसंतराव अवचार, आर. के. चौधरी, दिलीप तायडे, गोवर्धन इंगळे, रवि ताकतोडे, महादेव घुगे, रऊफ बेग, प्रल्हाद पौळकर, सदानंद भालेराव, वासुदेव भगत, सुभाष घुगे, प्रा. अनिल काळे, नागेश कव्हर, दत्तात्रय शिंदे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर मंथन होण्याच्या दृष्टिकोनातून या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक किसन करवते, अनिल सोळंके, दिलीप ठाकरे, सुमेध तायडे, विनोद कांबळे, नारायण कांबळे, निमंत्रक श्रावण जाधव व विजय भुरकाडे यांनी केले.