१५ आॅगस्टच्या ग्रामसभेत होणार घरकुल लाभार्थींच्या यादीवर चर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:12 PM2018-08-12T14:12:29+5:302018-08-12T14:13:19+5:30
वाशिम -प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र-ड च्या तयार झालेल्या लाभार्थींच्या याद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम -प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र-ड च्या तयार झालेल्या लाभार्थींच्या याद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी सहाही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना दिल्या.
प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत प्रपत्र अ, ब व क या घटकातील याद्या ग्रामीण विकास यंत्रणेला प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने घरकुल मंजूरीची कार्यवाही करण्यात येत आहे. सामान्य प्राधान्य यादीत समाविष्ठ नसलेल्या लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) घरकुलांचा लाभ देण्यासाठी प्रपत्र -ड ची यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषद स्तरावरून गटविकास अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही याद्यादेखील प्राप्त झालेल्या आहेत. यापूर्वी ग्रामसभेने मान्यता दिलेल्या याद्यांचे सर्वेक्षण करावयाचे आहे. यासंदर्भात ९ आॅगस्ट रोजी ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या सुचनेनुसार प्रपत्र ड याद्या तयार झाल्या किंवा सदरची प्रक्रिया सुरू आहे, अशा याद्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत ठेवावयाच्या आहेत. यावेळी यापूर्वीच्या ग्रामसभेतील प्राप्त प्रपत्र ड च्या याद्या ग्रामसभेत ठेवणे, सदरच्या याद्यावर आक्षेप, हरकती मागविणे, त्यानुसार पात्र, अपात्र लाभार्थींची यादी तयार करणे, जे लाभार्थी यापूर्वी अनावधानाने सुटले असतील, त्या लाभार्थींचीसुद्धा ग्रामसभेद्वारे मंजूरी घेऊन यादीमध्ये समावेश करणे, ग्रामसभेकरीता तालुकास्तरीय क्षेत्रीय अधिकारी, नोडल आॅफिसर यांची नियुक्ती करण्यात यावी व ग्रामसभेस हजर राहून पात्र लाभार्थींचा समावेश होण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना देणे आदी कार्यवाही गटविकास अधिकाºयांना करावी लागणार आहे. १५ आॅगस्ट २०१८ च्या ग्रामसभेत प्रपत्र - ड ची कार्यवाही करण्याच्या सूचना दीपक कुमार मीना यांनी गटविकास अधिकाºयांना दिल्या.