मडाण नदीच्या पुनरूज्जीवनासंदर्भात गडकरी यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 08:13 PM2017-11-07T20:13:08+5:302017-11-07T20:14:44+5:30

मडाण नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करून पुनरूज्जीवीत करणे अत्यावश्यक झाल्याबाबत शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली.

Discussion meeting with Gadkari regarding the revival of the river Madan | मडाण नदीच्या पुनरूज्जीवनासंदर्भात गडकरी यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

मडाण नदीच्या पुनरूज्जीवनासंदर्भात गडकरी यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देनदीकाठी बारा गावे शिष्टमंडळाने दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा पासून उगम पावणारी पिंपळखूटा येथे अडाण नदीला संगम होणारी मडाण नदी ही पुरातन नदी आहे. ही नदी उथळ झाल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे १२ गावातील अंदाजे २५ हजार नागरीक प्रभावित होतात. यामुळे मडाण नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करून पुनरूज्जीवीत करणे अत्यावश्यक झाल्याबाबत शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली.
मडाणच्या काठानजीक सायखेडा, निंबी, मानोली, गोलवाडी, अरक, चिंचाळा, जांब, आजगाव, हिसई, पार्डी, चांभई, पिंपळखूटा ही १२ गावे येतात. या गावातील शेकडो एकर शेतजमीन काठावर आहे. नदी गाळाने भरल्याने पावसाळ्यात शेतजमीनीतून पाणी वाहत असल्याने खरीप पिकाचे व शेतजमीनीचे प्रचंड नुकसान होते. सर्व पाणी वाहून गेल्याने रब्बी पिकासाठी नदीत पाणी नसते. तसेच विहीरी व विंधन विहीरी उन्हाळ्यात कोरड्या पडत आहे. मडाण खोलीकरण, रूंदीकरण व नदीत डोह निर्माण केल्यास या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. डोह निर्माण करून आवश्यकते नुसार सिमेंट नाला केल्यास २ हजार ५०० स.घ.मी. जलसाठा होवून १ हजार १०० हेक्टर शेतजमीन सिंचना खाली येवू शकते. अशा स्वरूपाची माहिती परीसरातील नागरीकांच्या शिष्टमंडळाने लिखीत स्वरूपात केंद्रीय जलसंधारण ना. नितीन गडकरी यांना नागपुर येथे  ५ नोव्हेंबर रोजी भेटून दिली. ना. गडकरीना निवेदन सादर करण्यात आले. त्यावर लक्ष्मीकांत महाकाळ, जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी, सायखेडा सरपंचा विद्या गहुले, मनिष गहुले, पं. स. सभापती निलीमा देशमुख, निंबी सरपंचा विशाखा मनवर, राजेश टोपले, मानोली सरपंचा शितल लोखंडे, नारायण लोखंडे, गौतम मनवर, चंदू महाकाळ, गोलवाडी सरपंच सागर शिंदे, अशोक शिंदे, अरक सरपंचा ललिता आमटे, चिंचाळा ग्रा.प. सदस्य राजु गजभार, जांब सरपंच साहेबराव भगत, धनंजय अव्हाळे, हिसईचे किशोर जाधव, चांभई सरपंच गजानन खरबडे, पार्डी सरपंच विजय लांभाडे, पिंपळखूटा सरपंचा चंदाताई धोटे, मसोलाचे भास्कर मुळे  स्वाक्षºया आहेत. 

Web Title: Discussion meeting with Gadkari regarding the revival of the river Madan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.