पोलीस पाटलांच्या बैठकीत धरणे आंदोलावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 05:51 PM2018-11-25T17:51:33+5:302018-11-25T17:52:20+5:30
विविध मागण्या प्रलंबित : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मानोरा ( वाशिम ) : पोलीस पाटलांच्या विविध मागण्या ...
विविध मागण्या प्रलंबित : प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
मानोरा (वाशिम) : पोलीस पाटलांच्या विविध मागण्या प्रलंबित असून, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथे राज्यस्तरीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. यासंदर्भात मानोरा येथील विश्रामगृहात २५ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली.
गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामराव राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. जिल्ह्यातुन ३५० पोलिस पाटील मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती शामराव राठोड यांनी दिली.
पोलीस पाटील मानधन वाढीविषयी शासनस्तरावर कुठलाच ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे पोलीस पाटील संघटनेने रोष व्यक्त केला. याशिवाय अन्य विषयही प्रलंबित आहेत. या विषयांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथे २८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे आदींच्या नेतृत्वात धरणे आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातून ३५० पोलीस पाटील सहभागी होतील, असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला. बैठकीला गोपाल लाहोटी, येवतकर पाटील, मुंडे पाटील सुनिल पाटील, चौधरी पाटील सरोदे, नागरे पाटील, गाडे पाटील, गजानन चतरकर, जाधव पाटील, संदीप फांदळे, गजानन महाले आदींची उपस्थिती होती.