रेमडेसिविर इंजेक्शनबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:15+5:302021-04-18T04:40:15+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचा जबर फटका वाशिम जिल्ह्याला सुद्धा बसत आहे. दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात धुमाकूळ घातला आहे. याचा जबर फटका वाशिम जिल्ह्याला सुद्धा बसत आहे. दिवसागणिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढतच आहेत. त्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा भासत आहे. यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे म्हणून मालेगाव रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक यांनी अन्न व प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनची तुटवडा असल्याची माहिती त्यांनी शिंगणे यांना दिली. ऑक्सिजनच्या तुटवडा बाबतही शिंगणे यांना माहिती देऊन वाशिम जिल्ह्यात रेमडेसिवीर या इंजेक्शनचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा, अशी मागणी केली. यावर शिंगणे यांनी मागील दोन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे मान्य करून वाशिम जिल्ह्याला योग्य प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले.