मेडशीवरुन जाणाऱ्या महामार्गाबाबत अधिकाऱ्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:43 AM2021-07-27T04:43:12+5:302021-07-27T04:43:12+5:30
याबाबत रस्ता काम करणाऱ्या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी तिवारी यानी सांगितले की, सर्वप्रथम कंपनीकडून रस्ता बनविणे प्राथमिकता असून जोपर्यंत समस्या ...
याबाबत रस्ता काम करणाऱ्या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी तिवारी यानी सांगितले की, सर्वप्रथम कंपनीकडून रस्ता बनविणे प्राथमिकता असून जोपर्यंत समस्या समोर येत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचे सोडवणूक करता येत नाही . राष्ट्रीय महामार्ग मेडशी येथून गेलेला असल्याने दळणवळणाची साधने मेडशी गावातून जात होती. नवीन चौपदरीकरणाचे काम शासनस्तरावरून सुरू आहे . गावाला आधी बायपास काढण्यात आले, परंतु हा बायपास नसून मेडशीचा वळण मार्ग आहे सध्या तरी असे चित्र दिसत आहे . कारण की महामार्गातून येण्याकरिता कोणताही जंक्शन सध्यातरी देण्यात आलेला नाही. पातूरकडून येत असताना आणि मालेगावकडून मेडशीकडे
येत असताना बायपास असलेल्या रस्त्याला येण्याकरिता कोणतीच व्यवस्था नसल्याने व जंक्शन करिता जागा सध्यातरी अधिग्रहित न झाल्याने जंक्शनचा प्रश्न उपस्थित झाला आहे, लवकरच तो प्रश्न निकाली निघेल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मेडशी सरपंच शेख जमीर शेख गनिभाई यांना आश्वासन दिले. यावेळी सरपंच शेख जमीर शेख गनिभाई , माजी ग्रा. पं. सदस्य मो. मजहर, प्रसाद पाठक, डिझाईन इंजिनिअर रवी तेजा, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.