भविष्यनिर्वाह निधी प्रणालीबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:42 AM2021-07-30T04:42:38+5:302021-07-30T04:42:38+5:30
कोरोना संसर्गामुुळे मागील कित्येक महिन्यांपासून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शासनाची आर्थिक टंचाई पाहता शासनाने निवृत्त कर्मचारी व सेवेत रुजू ...
कोरोना संसर्गामुुळे मागील कित्येक महिन्यांपासून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शासनाची आर्थिक टंचाई पाहता शासनाने निवृत्त कर्मचारी व सेवेत रुजू असलेले कर्मचारी यांची भविष्यनिर्वाह निधीची प्रकरणे प्रलंबित ठेवली. शासनाने भविष्यनिर्वाह निधी प्रणाली बंद ठेवली. त्यामुळे निवृत्त कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. हक्काचा पैसा असूनसुद्धा कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या वेळी मिळत नसल्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन अमरावती विभागाचे शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांनी मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा केली.
००००००
प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्याची चिन्हे
भविष्यनिर्वाह निधी प्रणाली बंद असल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जाणवणाऱ्या समस्या मंत्री गायकवाड यांच्या निदर्शनात आणून दिल्या. ही प्रणाली सुरू करण्याबाबत ठोस आश्वासन देण्यात आले. त्यामुळे भविष्यनिर्वाह निधीची प्रलंबित प्रकरणे लवकरच निकाली निघण्याची चिन्हे आहेत.