ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकित विविध विषयांवर चर्चा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:23 PM2017-10-26T16:23:21+5:302017-10-26T16:25:16+5:30
वाशिम - जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बुधवारी वाशिम येथे पार पडलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
नगर परिषदच्या अधिनियमातील कलम १२४ (२) अंतर्गत नगरातील मालमत्तेवर चार वर्षाकरिता आकारणी होत होती. सदर वाढ चुकीची असुन ती पाच वर्षाकरिता असावी ही ग्राहकाभिमुख मागणी ग्राहक पंचायत, मंगरूळपीर अंतर्गत ग्राहक परिषद, वाशिम येथे मांडण्यात आली. त्याप्रकरणी मुख्याधिकाºयांनी समन्वयाची भूमिका घेत करदात्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून, आता दर पाच वर्षांनी कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अन्न पुरवठा अधिकारी देवराव वानखडे, पोलीस अधीक्षकांच्या प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती विल्लेकर, उप प्रादेशीक परिवहन विभागाचे प्रतिनिधी मोटार वाहन निरीक्षक एम.बी. मडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, मंगरूळपीर मुख्याधिकारी वाहुरवाघ, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी विजय राठोड आदी शासकिय सदस्य उपस्थित होते. नगर परिषदांची कर आकारणी दर पाच वर्षांनी करावी, असा मुद्दा मांडण्यात आला. सदर प्रकरण ग्राहक संरक्षण परिषदेच्या अंतर्गत सोडविण्याकरिता जिल्हाधिकाºयांकडे मांडण्यात आले. नगर परिषदांच्या मुख्याधिकाºयांनी दर पाच वर्षांनी मालमत्ता कर आकारणी मान्य केली असून, यामुळे आता होणाºया सर्व कर आकारणी मालमत्ता ही पाच वर्षाने होणार असल्याचे स्पष्ट केले. ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक होवुन करदात्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. हा प्रश्न सोडविण्याकरिता सुधीर घोडचर, प्रा. विरेंद्र ठाकुर, उमेश नावंधर, अभय खडेकर, सुधीर देशपांडे, प्रमोद गंडागुळे, गजानन सानी, जुगल कोठारी, रमेश बज, धनंजय जतरक, विरेंद्र देशमुख, नामदेव बोरचाटे, डॉ. भोंडे तसेच सर्व अशासकिय सदस्यांनी सहकार्य केले.