लोककलावंतांच्या विविध प्रश्नांवर चर्चा; मंत्रालयावर मोर्चाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:44+5:302021-07-19T04:25:44+5:30
लोक कलावंतांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तालुक्यातील काटा येथे १६ जुलै रोजी संघटनेची विशेष महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीला ...
लोक कलावंतांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तालुक्यातील काटा येथे १६ जुलै रोजी संघटनेची विशेष महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीला अध्यक्षस्थानी जगदीश इंगळे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य शाहीर केशव डाखोरे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातून शाहीर, लोककलावंत, गोंधळी, भारुडकार, नकलाकार, कलापथक, बँड कलावंत, भजनी मंडळ, मंडप डेकोरेशन आणि बारी मंडळ कीर्तनकारांसह शासनाच्या स्वच्छता दिंडीतील कलावंत उपस्थित होते. केशव डाखोरे म्हणाले की, कोरोनामुळे कलावंतांना रोजगार नाही. त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातून १२०० ते १३०० कलावंतांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत; परंतु या प्रस्तावावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष इंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कलावंतांच्या स्थगित आणि प्रलंबित मागण्या निकाली काढण्याकरिता आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येत आहे. कलावतांच्या मागण्यांबाबत लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब पडवळ, राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे, प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले यांच्यामार्फत मुख्यंमत्री, सामाजिक न्यायमंत्री यांची भेट घेऊन अधिवेशनात लक्षवेधी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती जगदीश इंगळे यांनी दिली.
^^^^^^^^^^
शासनाकडे कलावंतांचे १३०० प्रस्ताव
वाशिम जिल्ह्यातून १२०० ते १३०० कलावंतांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत; परंतु या प्रस्तावावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष इंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कलावंतांच्या स्थगित आणि प्रलंबित मागण्या निकाली काढण्याकरिता आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येत असल्याचे माजी जि.प. सदस्य शाहीर केशव डाखोरे यांनी सांगितले.