चिंतन बैठकीत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:52+5:302021-08-17T04:47:52+5:30
अध्यक्षस्थानी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे वसंतराव जोगदंड होते. पं.स. सदस्य रवी आढाव, ज्ञानेश्वर बाजड, न.प.च्या पाणीपुरवठा सभापती पप्पीबाई कदम, ...
अध्यक्षस्थानी लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे वसंतराव जोगदंड होते. पं.स. सदस्य रवी आढाव, ज्ञानेश्वर बाजड, न.प.च्या पाणीपुरवठा सभापती पप्पीबाई कदम, सरपंच मनोज थोरात, भारत अंभोरे, महिपती इंगळे, ग्रा.पं. सदस्य संतोष कांबळे, संतोष लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले. अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे शिफारस करावी, अनुसूचित जातीचे वर्गीकरण करुन शासनाने लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड याप्रमाणे आरक्षण द्यावे यासह इतरही मागण्यांच्या पूर्ततेकरिता आमदार, खासदारांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी भास्कर कांबळे, भीमराव साठे, रामकृष्ण अंभोरे, संतोष लोखंडे, के. एच. मानवतकर, फकिरा मानवतकर, संदीप कांबळे, गोपीचंद गायकवाड, राजू गायकवाड, एकनाथ कांबळे, संतोष कांबळे, भानुदास कांबळे, अनिल मानवतकर, एच.एफ. थोरात, एम.टी. पारवे, केशव जोगदंड, श्रीराम कांबळे, संतोष डोंगरे, भानुदास डोंगरे, श्रावण गायकवाड, प्रकाश गायकवाड, बळीराम खंदारे, केशव सरोदे, अनंता कांबळे, संजय आल्हाट उपस्थित होते. प्रास्ताविक दत्तराव दुतोडे यांनी केले. के.डी. मानवतकर यांनी आभार मानले.