कृषी विषय समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 03:56 PM2019-02-27T15:56:26+5:302019-02-27T15:57:03+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीच्या मंगळवारी पार पडलेल्या सभेत सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश, वैयक्तिक लाभाच्या योजना यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या कृषी विषय समितीच्या मंगळवारी पार पडलेल्या सभेत सिंचन विहिरीचे कार्यारंभ आदेश, वैयक्तिक लाभाच्या योजना यासह विविध विषयांवर चर्चा झाली.
कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांच्या दालनात पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य हेमेंद्र ठाकरे, गजानन अमदाबादकर, मीना भोने, जया खराबे, छाया सावके, मोहन महाराज राठोड, अन्नपूर्णा मस्के, राजेश राठोड, श्याम बढे, प्रभारी कृषी विकास अधिकारी शेळके, मोहिम अधिकारी नरेंद्र बारापात्रे, कृषी अधिकारी पाटकर, देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सभेच्या सुरूवातीला कृषी सभापती विश्वनाथ सानप यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले. त्यानंतर काही कामानिमित्त ते निघून गेल्याने उर्वरीत सभेचे अध्यक्ष म्हणून हेमेंद्र ठाकरे यांनी कामकाज पाहिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सिंचन विहिरी बांधकामाचे कार्र्यारंभ आदेश तात्काळ देऊन विहिरीचे कामे सुरू करण्याचे व अनुदान वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शेष निधी अंतर्गत शेतकरी लाभार्थीची निवड करण्यात आली. ताडपत्री, सोयाबीन चाळणी यंत्र, स्प्रे पंपचे अनुदान पात्र शेतकरी यांचे खात्यात थेट जमा करण्यात यावे तसेच कृषी विभागाच्या इतरही समस्या जाणून घेतल्या.