भारतीय बौद्ध महासभेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:06+5:302021-09-21T04:47:06+5:30
कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत, जिल्हा कोषाध्यक्ष गोविंदराव इंगळे, संध्याताई पंडित, छगन सरकटे, प्रा. ...
कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भगत, जिल्हा कोषाध्यक्ष गोविंदराव इंगळे, संध्याताई पंडित, छगन सरकटे, प्रा. हरिदास बनसोड, पंढरी खिल्लारे, सुमन ताजने, दिलीप गवई, हर्षल इंगोले, बळीराम पट्टेबहादुर, शालिग्राम चुंबळे, पी. पी. सरकटे, रमेश अवचार, गोविंदराव राऊत, प्रा. शालिग्राम पठाडे, प्रमोद बेलखेडे, डॉ. कोंडूजी तायडे, रंजन घुगे, श्रीकिसन सरकटे, विकास खिल्लारे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक उपक्रम, भारतीय बौद्ध महासभेची आगामी काळातील वाटचाल यासह विविध विषयांवर चर्चा झाली. महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी महोत्सव वर्ष १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाले असून या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पोफळे यांची निवड करण्यात आली. यावेळी हरिश्चंद्र पोफळे यांनी वामनदादा प्रेमी कलावंताचा ताफा घेऊन गावोगावी जाऊन वामनदादांच्या गीतांचा प्रचार करू अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शालिग्राम पठाडे यांनी केले.