गाव विकास कृती आराखड्यावर चर्चा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:57 AM2021-02-26T04:57:15+5:302021-02-26T04:57:15+5:30
या वेळी नवनिर्वाचित शुभांगी वायकर, उपसरपंच नंदकिशोर वनस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
या वेळी नवनिर्वाचित शुभांगी वायकर, उपसरपंच नंदकिशोर वनस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. १५ व्या वित्तीय आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी कृती आराखडा या विषयावर चर्चा करून निधी सर्वानुुमते खर्च करण्याचा ठराव घेणे बंधनकारक असल्याने ही सभा घेण्यात आली. सर्वांच्या तोंडी व लेखी सूचना या अनुसार कामे करण्याचा ठराव तसेच कृती आराखडा सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी चौधरी, प्रशासक सोेंडकर. सरपंच शुंभागी वायकर. उपसरपंच नंदकिशोर वनस्कर यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती. गावात रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य सुविधा, घरकुल योजना यासह विविध विकासात्मक कामे करण्यावर चर्चा झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी चौधरी यांनी केले. आभार नंदकिशोर वनस्कर यांनी मानले.