अंगणवाडीसेविकांच्या मागण्यांसाठी आयुक्तांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 03:37 PM2018-06-26T15:37:48+5:302018-06-26T15:41:23+5:30
वाशिम: राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिनिधींची एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रशासकीय अधिकारी व महिला व बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांच्याशी चर्चा झाली.
वाशिम: राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिनिधींची एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रशासकीय अधिकारी व महिला व बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांच्याशी चर्चा झाली असून, या चर्चेदरम्यान प्रलंबित मागण्यासाठी सोडविण्यासाठी आयुक्तांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. ही माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सविता इंगळे यांनी मंगळवारी दिली.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने महिला व बालविकास आयुक्त यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध १७ मागण्यांचे निवेदनही सादर केले. त्यावेळी अंगणवाडी सेविकांचे एप्रिल, मे महिन्याचे प्रलंबित मानधन १५ दिवसांत अदा करण्याचे आश्वासन आयुक्त मालो यांनी दिले. त्याशिवाय ओटी भरण, उष्टावळ पंगत आदिंचे मार्चपर्यंतचे पैसे, टीएडीए याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली, तसेच सेवासमाप्ती लाभाची रक्कम १० दिवसांत देतानाच सेवानिवृत्तीची १ लाख ७५ हजारांची मर्यादा काढून एक वर्षाच्या सेवेसाठी एक महिन्याचे वेतन देण्याच्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागणीही शासनाकडे मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळेच आयुक्त कार्यालयासमोर नियोजित आंदोलन आॅगस्टपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाºयांच्या संघटनेने घेतला असून, पोषण आहाराच्या रकमेत केंद्राच्या वाढीनुसार वाढ करणे, रिक्त जागा तातडीने भरणे, पदोन्नतीवरील स्थगिती उठविण्याबाबतही शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष सविता इंगळे यांच्यासह, जिल्हा सचिव मालती राठोड, वाशिम तालुकाध्यक्ष किरण गिºहे, तालुका सचिव सरस्वती सुर्वे, कारंजा तालुकाध्यक्ष शेंद्रे, नवघन, सोनल ढोबळे आदिंची उपस्थिती होती.