महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ कायम; इच्छुक संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 11:44 AM2021-07-08T11:44:33+5:302021-07-08T11:46:31+5:30

Discussions in Mahavikas Aghadi continue: सत्ताधारी पक्षाचे उमेदवार एकमेकांविरूद्ध दंड थोपटून निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

Discussions in Mahavikas Aghadi continue; In desperate confusion! | महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ कायम; इच्छुक संभ्रमात !

महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ कायम; इच्छुक संभ्रमात !

googlenewsNext

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने इच्छुक उमेदवार संभ्रमात आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने दोन सदस्यांना डच्चू देत अन्य उमेदवाराला पसंती देत रणनितीचे घाेडे पुढे दामटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला. 
त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन जानेवारी २०२० मध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. आता पोटनिवडणूक लागल्याने सत्ताधारी पक्षाचे उमेदवार एकमेकांविरूद्ध दंड थोपटून निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.
माजी खासदार अनंतराव देशमुख आणि माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येत जनविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या युतीचे उमेदवार आखाड्यात उतरवून प्रमुख पक्षांसमोर आव्हान निर्माण केले. जनविकास व वंचित बहुजन आघाडीचे आव्हान परतवून लावण्यासाठी राकाँ, काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी  स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीबाबत बैठका घेतल्या. परंतु, जागा वाटपावरून अद्यापही तोडगा निघाला नसून, चर्चेभोवतीच आघाडी फिरत असल्याने तिन्ही पक्षाचे इच्छुक उमेदवारही संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
राकॉं, सेना, कॉंग्रेसचे उमेदवार जैसे थे;         वंचित बहुजन आघाडीने ४ उमेदवार बदलले !
वंचित बहुजन आघाडीने जानेवारी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत पांगरी नवघरे आणि उकळीपेन या गटातून विजयी झालेले रत्नमाला उंडाळ व चरण गोटे या दोन सदस्यांना वगळून पोटनिवडणुकीत अन्य उमेदवारांना पसंती दिली आहे. जऊळका रेल्वे व जोडगव्हाण या दोन पंचायत समिती गणातून गतवेळी विजयी झालेल्या उमेदवारांना वगळून यावेळी अन्य उमेदवारांना उमेदवारी बहाल केली. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना व जनविकास आघाडीने गतवेळी विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना पोटनिवडणुकीच्या मैदानात पुन्हा उतरविले आहे.


एकमेकांविरूद्ध      अर्ज दाखल !
महाविकास आघाडीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने जि.प. गट व पं.स. गणात तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विश्वसनीय सूत्रांनुसार महाविकास आघाडीची शक्यता मावळली असून, या तिन्ही पक्षांचे उमेदवार स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करून आपापल्या सर्कलमध्ये प्रचारही सुरू केल्याची माहिती आहे.

Web Title: Discussions in Mahavikas Aghadi continue; In desperate confusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.