काजळेश्वर परिसरात हरभरा पिकावर मर रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:33 AM2021-01-09T04:33:47+5:302021-01-09T04:33:47+5:30
गतवर्षी भरपूर पाऊस पडल्याने काजळेश्वर परिसरातील जलस्रोत काठोकाठ भरले. परिणामी यंदाच्या रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्रही वाढले. सिंचन सुविधा असलेल्या ...
गतवर्षी भरपूर पाऊस पडल्याने काजळेश्वर परिसरातील जलस्रोत काठोकाठ भरले. परिणामी यंदाच्या रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्रही वाढले. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी गहू पिकाच्या पेरणीवर भर दिला, तर कोरडवाहू क्षेत्रातही हरभरा पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. गत महिनाभर पोषक वातावरण असल्याने हरभऱ्याचे पीक चांगले बहरून घाटे परिपक्व होण्याच्या अवस्थेत आले. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. तथापि, गत आठवडाभरापासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सकाळी उशिरापर्यंत धुके पडत असल्याने हरभरा पिकावर विपरीत परिणाम होत आहे. या पिकावर घाटे अळीसह इतर किडींचा प्रादुर्भाव होत आहेच. त्याहून गंभीर बाब म्हणजे या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने पीक सुकत चालले आहे. यावर नियंत्रण मिळविणे कठीण असल्याने हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. त्यामुळेच शेतकरी वर्गात चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.
===Photopath===
080121\08wsm_1_08012021_35.jpg
===Caption===
काजळेश्वर परिसरात हरभरा पिकावर मर रोग