जैववैद्यकीय कचºयाच्या विल्हेवाटीचा प्रश्न झाला गंभीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:43 AM2021-02-11T04:43:07+5:302021-02-11T04:43:07+5:30
जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी दवाखान्यांमधून दैनंदिन बाहेर पडणारा ‘जैववैद्यकीय कचरा’ (बायोमेडिकल वेस्ट) उचलून नेण्याकरिता अमरावती येथील ‘मे. ग्लोबल इको ...
जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी दवाखान्यांमधून दैनंदिन बाहेर पडणारा ‘जैववैद्यकीय कचरा’ (बायोमेडिकल वेस्ट) उचलून नेण्याकरिता अमरावती येथील ‘मे. ग्लोबल इको सेव सिस्टीम’ या खासगी कंपनीला जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा या नगर परिषदांनी व मालेगाव, मानोरा या नगर पंचायतींनी कंत्राट दिला आहे; मात्र, केवळ शासकीय आणि काही मोठ्या खासगी दवाखान्यांनीच कंपनीशी करार केला असून, छोट्या स्वरूपातील अनेक ‘क्लिनिक’ यापासून दूर आहेत.
............
‘बायोमेडिकल वेस्ट’साठी नोंदणी केलेल्या दवाखान्यांची संख्या
वाशिम
१५०
मंगरूळपीर
३०
कारंजा
३५
मानोरा
२०
मालेगाव
२५
.....................
असे आहेत दर
१ ते ३ खाटांची क्षमता - ६२३ रुपये प्रतिमहा
३ व ४ खाटांची क्षमता - ६.६० प्रतिखाट प्रतिदिन
पॅॅथॉलॉजी पदवीधारक व्यावसायिक - ८८० प्रतिमाह
दंत वैद्यकीय व्यावसायिक - ५१४ प्रतिमाह
गुरांचे दवाखाने - ११०० प्रतिमाह
क्लिनिक, डिस्पेन्सरी, डीएमएलटी, खासगी वैद्यकीय दवाखाने - २७५ रुपये प्रतिमाह
...............
वाशिम जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतींनी कंपनीला ३० वर्षांसाठी करारबद्ध केलेले आहे. असे असले तरी दवाखान्यांनीदेखिल स्वत:हून जैव वैद्यकीय कचरा उचलून नेण्यासंबंधी कंपनीशी संपर्क साधायला हवा. मात्र, सद्यातरी जिल्ह्यातील अनेक दवाखान्यांनी यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे मोजक्याच दवाखान्यांमधून कचरा उचलला जात आहे.
- विजय सारवे
मे.ग्लोबल इको सेव, अमरावती