रस्त्याच्या मागणीकडे संबंधितांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:40 AM2021-04-06T04:40:34+5:302021-04-06T04:40:34+5:30

0000000000 रस्त्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय केनवड : महागाव ते रत्नापूर, मारमाळ, पाणंद रस्ता सुस्थितीत नसल्याने, तसेच महागाव-सोनाटी शिव रस्त्याचे ...

The disregard of the concerned towards the demand of the road | रस्त्याच्या मागणीकडे संबंधितांचे दुर्लक्ष

रस्त्याच्या मागणीकडे संबंधितांचे दुर्लक्ष

Next

0000000000

रस्त्याअभावी

शेतकऱ्यांची गैरसोय

केनवड : महागाव ते रत्नापूर, मारमाळ, पाणंद रस्ता सुस्थितीत नसल्याने, तसेच महागाव-सोनाटी शिव रस्त्याचे खडीकरण झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी पंचायत समिती सदस्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

00000000000

अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा

वाशिम : शहरातील विविध भागात विक्रेत्यांनी फूटपाथसमोर आपली दुकाने थाटल्याने बाजारात येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावरच उभी करीत आहेत. शहरातील अकोला चौक, भगतसिंह चौक, डॉ. आंबेडकर चौक, बसस्थानक चौक, आदी भागात मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

0000000000

कोरोनाविषयक सूचनांचे पालन करा

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती मर्यादित स्वरुपात राहणार आहे. त्या अनुषंगाने देण्यात आलेल्या कोरोना विषयक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी संबंधित यंत्रणांना बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत केले आहे.

00000000000

अवैध रेती वाहतुकीवर कारवाईचे आदेश

वाशिम : रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. असे असताना चोरट्या मार्गाने अवैध रेती वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी कारवाई करावी, असे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी गुरुवारी तहसीलदारांना दिले आहेत.

0000000000

कामरगाव परिसरात आणखी चार बाधित

कामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरातील आणखी चार व्यक्तींना कोरोना संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाकडून सोमवारी प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले आहे. दोन्ही बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

00000000000

रुग्णालयांची तपासणी मोहीम

वाशिम : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्ण्मुगराजन एस. यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील रुग्णालयांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

00000000000

मानोरा तालुक्यात आणखी पाच बाधित

पोहरादेवी : मानोरा तालुक्यात पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून, गुरुवारी तालुक्यातील पाचजण बाधित आढळल्यानंतर शनिवारी आणखी दोघांना कोरोना संसर्ग असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: The disregard of the concerned towards the demand of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.