पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:08 PM2017-09-20T19:08:11+5:302017-09-20T19:58:36+5:30
उंबर्डाबाजार : विज वितरण कंपनीचे उंबर्डाबाजार ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेक डे जवळपास ९ लाख रुपयाचे विज देयक थकल्याने १६ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत केल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करण्याची पाळी उंबर्डाबाजार ग्रामवासीयांवर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उंबर्डाबाजार : विज वितरण कंपनीचे उंबर्डाबाजार ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेकडे जवळपास ९ लाख रुपयाचे विज देयक थकल्याने १६ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा योजनेचा विज पुरवठा खंडीत केल्याने ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करण्याची पाळी उंबर्डाबाजार ग्रामवासीयांवर आली आहे.
सविस्तर असे की, ग्रामपंचायत उंबर्डाबाजार च्यावतीने बागापुर पाझर तलावाच्या भिंती लगत असलेल्या विहीरीमधुन उंबर्डाबाजार पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठा योजनेच्या देयकाबाबत ग्रामपंचायतकडे जवळपास ९ लाख रुपये थकीत आहे. विशेष म्हणजे गावात १० दिवसानंतर एका कॉकचा नंबर लागतो.
त्यामुळे गावकºयाकडे सुध्दा ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागाचे १९ लाख ५१ हजार रुपये थकीत आहे. महत्वाचे म्हणजे उंबर्डाबाजार चे ग्रामविकास अधिकारी केवळ मासीक बैठकीसाठी उंबर्डाबाजार ला येवुन इतर कामकाज मात्र कारंजा येथुनच पाहत असल्याने कर वसुलीवर मोठा परिणाम होत आहे.