‘लेखणी बंद’मुळे कामकाजाचा खोळंबा !
By admin | Published: March 17, 2017 04:32 PM2017-03-17T16:32:33+5:302017-03-17T16:32:33+5:30
जिल्हा परिषदेतील लेखासंवर्गीय कर्मचाºयांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले असून, तिसºया दिवशीही संप सुरूच आहे. यामुळे कामकाजाचा खोळंबा झाला.
वाशिम : शासनस्तरावर प्रलंबित विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हा परिषदेतील लेखासंवर्गीय कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले असून, तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. यामुळे कामकाजाचा खोळंबा झाला. सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राजपत्रित दर्जा देण्यात यावा, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ह्यग्रेड पेह्ण वरिष्ठ सहाय्यक लेखा कर्मचाऱ्यांना ४०० रुपये व सहाय्यक लेखा अधिकारी यांना १०० रुपये वाढवून मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद लेखा संवर्गातील कर्मचारी १५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलनावर आहेत. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील सर्व लेखा कर्मचारी सहभागी आहेत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष रामानंद ढंगारे यांनी दिली.