जि. प. सीईओंकडून पाझर तलावांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:07+5:302021-06-19T04:27:07+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता पाझर तलावाचे रूपांतर साठवण तलावात करण्यासाठी जिल्ह्यातील ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता पाझर तलावाचे रूपांतर साठवण तलावात करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रत्येकी पाच कामे करण्याची बाब प्रस्तावित आहे. त्यापैकी आठ तलावांच्या कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील अमानी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पंत यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश देताना सांगितले की, या तलावामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताला सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. तेव्हा या तलावाचे काम दर्जेदार करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, प्रभारी कार्यकारी अभियंता एस. ए. खान, उपअभियंता बोके, शाखा अभियंता शेवाराम चव्हाण, कंत्राटदार दिलीप गट्टाणी, परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.