खोलीकरण केलेल्या नाल्यांची वर्षभरात दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 08:15 PM2017-08-03T20:15:32+5:302017-08-03T20:17:23+5:30
मंगरुळपीर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिर्ल्हयात गतवर्षी अनेक नाले, नव्या आणि तलावांचे खोलीकरण करण्यात आले. यामध्ये मंगरुळपीर येथील अरुणावती या लहान नदीवजा नाल्यांचा समावेश होता.तथापी १ कोटी रुपयाहून अधिक खर्च झालेल्या या नाल्याची वर्षभरात दुरवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातून मंगरुळपीर येथील मानोरा मार्गावर असलेल्या अरुणावती नदीचे खोलीकरण प्रशासनाकडून करण्यात आले. यासाठी मोठ्या प्रमाणात लोकसहभागही लाभला. या खोलीकरणानंतर अरुणावती नदीत दोन जिवंत झरे आढळले. गत पावसाळ्यात ही नदीवजा नाला दुथडी भरुन वाहु लागला.त्यामुळे परिसरातील शेतांच्या विहीरी काठोकाठ भरल्या. पाण्याची पातळी वाढली, त्यामुळे या नाल्यांचे देखरेख आणि सुरक्षा सावटात होती, परंतु जनतेच्या कुप्रवृत्तीमुळे या नाल्याचे वर्षभरात तीन तेरा वाजले. धार्मिक उत्सवातील निर्माल्य, गावातील घाणकचरा यात टाकल्यामुळे सदर नाला पुन्हा वर्षभरातच गाळ साचुन बुजत चालल्याचे दिसत आहे.