कोविड केंद्रात रुग्णांना वृक्ष वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:07 AM2021-05-05T05:07:14+5:302021-05-05T05:07:14+5:30
यावेळी प्रामुख्याने कडुलिंब, सीताफळ, जांभूळ आदी रोपे देण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन पातळी कमी होत आहे. त्यामुळे झाडे ...
यावेळी प्रामुख्याने कडुलिंब, सीताफळ, जांभूळ आदी रोपे देण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजन पातळी कमी होत आहे. त्यामुळे झाडे लावणे ही काळाची गरज आहे. औद्योगिकरण व यांत्रिकीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली. पण त्याच प्रमाणात झाडे लावली नाहीत. त्यामुळे ऑक्सिजन मिळणेही कठीण होते. काही वेळेला ऑक्सिजन विकतही मिळत नाही. ऑक्सिजन पातळी वाढवायची असेल तर प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावून ते जगवावे. त्यामुळे काय होईल जेवढी लोकसंख्या तेवढी झाडे तयार होतील. येणारा काळ आपल्यासाठी सुरक्षित राहील. त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक तरी झाड लावावे, असे आवाहन यावेळी अश्विनी अवताडे यांनी केले. यावेळी डॉ. राम अवताडे, कामगार कल्याण केंद्रप्रमुख प्रमोद घोडचर तसेच कोविड सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. महाकाळ व आरती अभयंकर, पोलीस कर्मचारी खान तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर, नर्स व सुरक्षा रक्षक यांनासुद्धा यावेळी वृक्ष वाटप करण्यात आले.