शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ४.५१ लाख थाळ्यांचे वितरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:38 AM2021-02-12T04:38:33+5:302021-02-12T04:38:33+5:30
कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, गोरगरीब, मजूर व गरजूंना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता राज्य शासनाने गतवर्षापासून शिवभोजन योजना सुरू केली. ...
कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, गोरगरीब, मजूर व गरजूंना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता राज्य शासनाने गतवर्षापासून शिवभोजन योजना सुरू केली. मार्च महिन्यापर्यंत १० रुपयांत एक थाळी देण्यात आली. त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने शिवभोजन केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या थाळीच्या किमतीत ५० टक्के कपात करून पाच रुपयांत शिवभोजन देण्यात येत आहे. दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत शिवभोजन थाळीचे वितरण केले जाते. जिल्ह्याच्या मुख्यालय परिसरात, जिल्हा रुग्णालय, बसस्थानक, रेल्वेस्टेशन यासह गर्दीच्या ठिकाणी शिवभोजन केंद्राची सुविधा उपलब्ध केली जाते. जिल्ह्यात १५ ठिकाणी शिवभोजन केंद्र असून २६ जानेवारी २०२० ते २६ जानेवारी २०२१ या वर्षभरात १५ केंद्रांच्या माध्यमातून चार लाख ५१ हजार ५८९ थाळ्या वितरीत करण्यात आल्या आहेत.
०००
तालुकानिहाय शिवभोजन केंद्र
वाशिम५
रिसोड२
कारंजा२
मं.पीर २
मानोरा २
मालेगाव२
०००००
शिवभोजन थाळीचा दर - ५ रुपये
वर्षभरात थाळीचे वितरण - ४.५१ लाख
००००
कोट बॉक्स
गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी २६ जानेवारी २०२० पासून शिवभोजन योजनेची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात वाशिम शहरात पाच आणि उर्वरीत पाच शहरात प्रत्येक दोन असे एकूण १५ शिवभोजन केंद्र आहेत. वर्षभरात चार लाख ५१ हजार ५८९ थाळ्या वितरीत करण्यात आल्या.
- सुनील विंचनकर
जिल्हा पुरवठा अधिकारी वाशिम