अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानकडून महिलांना ब्लँकेटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:11 AM2021-01-08T06:11:09+5:302021-01-08T06:11:09+5:30

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी हरिदास पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून बचत गटाचे अध्यक्ष गोपाल राऊत , सरपंच सुनील ...

Distribution of blankets to women by Antariksha Parshwanath Sansthan | अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानकडून महिलांना ब्लँकेटचे वाटप

अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानकडून महिलांना ब्लँकेटचे वाटप

Next

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी हरिदास पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून बचत गटाचे अध्यक्ष गोपाल राऊत , सरपंच सुनील राऊत, ग्रापं सदस्य त्र्यंबक राऊत, सुरेश वानखडे, रमेश राऊत, विष्णू गिरे, माजी सभापती गोपीचंद गवई यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक लक्ष्मण कांबळे यांनी केले. गोपाल राऊत व पारसमल गोलेच्छा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पारस गोलेच्छा यांनी सांगितले की, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. संस्थानच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेला ब्लँकेट टोपी आणि कानपट्टीचे वाटप करण्यात येत आहे. याचा लाभ गोरगरीब जनतेला व्हायला हवा, यासाठी आम्ही संस्थानच्यावतीने प्रयत्न करीत आहोत. यापुढेही गोरगरीब जनतेला संस्थानकडून मदत करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आभार प्रदर्शन राहुल भगत यांनी केले. याप्रसंगी गावातील असंख्य महिलांची व नागरिकांची उपस्थिती होती.

===Photopath===

050121\05wsm_3_05012021_35.jpg

===Caption===

अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानकडून महिलांना ब्लँकेटचे वाटप

Web Title: Distribution of blankets to women by Antariksha Parshwanath Sansthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.