आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र वितरणास सुरूवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:42 PM2019-03-18T16:42:31+5:302019-03-18T16:43:34+5:30
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी विहित केलेल्या १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली असून, याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र वितरणास सोमवार, १८ मार्चपासून सुरूवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असणाºया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी विहित केलेल्या १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली असून याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेचे प्रमाणपत्र वितरणास सोमवार, १८ मार्चपासून सुरूवात झाली आहे.
सवर्ण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटूंबांना आरक्षण मिळावे, अशी मागणी दीर्घ काळापासून होत होती. त्याचा विचार करून केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी अल्पावधीत सुरू झाली असून ‘महा-आॅनलाईन’मार्फत चालविल्या जाणारे महा-ई-सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्रतेचे प्रमाणपत्र तयार करून देण्यास सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. यादिवशी काही लाभार्थ्यांना तहसीलदारांच्या डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संबंधित घटकातील लाभार्थ्यांकडून स्वयंघोषणापत्र, १३ आॅक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वीपासून महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा दाखला, आधारकार्डची प्रत, बोनाफाईड, निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला, वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा अधिक नसल्याचा उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे मागविण्यात येत आहेत.
आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शासनाकडून १० टक्के आरक्षण जाहीर करण्यात आल्यानंतर ‘महा-आॅनलाईन’मार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्रतेचे प्रमाणपत्र तयार करून देण्यास सोमवारपासून सुरूवात झाली आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून हे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.
- सागर भुतडा
जिल्हा समन्वयक, ‘महा-आॅनलाईन’, वाशिम