जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शिरपूर येथे पिककर्ज वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:42 PM2018-04-05T14:42:59+5:302018-04-05T14:50:13+5:30
शिरपूर जैन: अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरपूर येथील शाखेच्यावतीने ५ एप्रिलपासून खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली.
शिरपूर जैन: अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरपूर येथील शाखेच्यावतीने ५ एप्रिलपासून खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली.
दरवर्षी खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवा सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना १ मार्चपासून पीककर्ज वितरणास सुरुवात करण्यात येते; परंतु यावर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर थकित कर्ज भरावे की नाही, अशा मनस्थितीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास विलंब केला. त्यामुळे सेवा सोसायट्या व बँक प्रशासनही पीक कर्ज वितरणास सुरुवात करू शकले नाही. तथापि, ३१ मार्चनंतर बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणासाठी तयारी केली. या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जासंबंधी सर्व कागदपत्रे सेवा सोसायटीमार्फत बँकेकडे सादर करण्याच्या सुचना करण्यात आल्या आणि ५ एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरपूर शाखेंतर्गत येणाऱ्या शेलगाव बगाडे सेवा सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरीत करण्यात आले. यावेळी बँकेचे निरीक्षक काशिनाथ गायकवाड, शाखा अधिकारी बी.बी. धनगोल, सेवा सोसायटी उपाध्यक्ष लक्ष्मण देशमुख, गटसचिव संदीप सोमटकर, कर्मचारी भगवान साबळे, धीरज बाजड, एस. आर. भागवतकर यांच्यासह दत्तराव देशमुख, द्वारकाबाई साबळे, भास्कर मनेर, पुंडलिक राऊत, देविदास श्रीखंडे, संगीता सरनाईक, केशव श्रीखंडे, विलास श्रीखंडे, बाळासाहेब देशमुख आदिंची उपस्थिती होती.