जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:28+5:302021-09-21T04:47:28+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. तसेच यामुळे बालकाची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना जंतनाशक गोळ्या दिल्या जात आहेत. या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
००००००००००००००००००००
आशा, अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन वितरण
६ ते १९ वर्षे वयोगटातील शाळेत जाणाऱ्या सर्व बालकांसाठी व किशोरवयीन मुला-मुलींसाठी शासकीय, अनुदानित, विना अनुदानित सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये संस्थास्तरावर, तसेच शाळेत न जाणाऱ्या बालकांना, किशोरवयीन मुला-मुलींना अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याद्वारे २१ सप्टेंबर २०२१ रोजी जंतनाशक गोळी घरपोहोच देण्यात येणार आहे.
कोट :
जंतनाशक गोळ्या वितरण कार्यक्रमांतर्गत १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना अर्धी गोळी पावडर करून देण्यात येईल, तसेच २ वर्षे ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एक गोळी चावून खाण्यासाठी देण्यात येणार आहे. या गोळीचा कोणताही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होणार नाही. त्यामुळे याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी,
०००००००००००००
२१ सप्टेंंबरच्या वंचितांना २८ ला वितरण
जिल्ह्यातील सुमारे ३ लक्ष ३९ हजार ३८३ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन झाल्यानंतर यादिवशी ज्यांना गोळ्यांचे वाटप झालेले नाही, अशा मुलांना २८ सप्टेंबर रोजी मॉपअप दिनी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.