पेंडगाव येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:38 PM2018-07-10T14:38:14+5:302018-07-10T14:39:03+5:30
रिसोड : तालुक्यातील पेंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच भारत माध्यमिक शाळा चिंचांबापेन मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम विठ्ठलराव सरनाईक व दानशुर व्यक्तीमत्व संतोष मुंदडा यांच्या पुढाकारातुन घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : तालुक्यातील पेंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच भारत माध्यमिक शाळा चिंचांबापेन मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम विठ्ठलराव सरनाईक व दानशुर व्यक्तीमत्व संतोष मुंदडा यांच्या पुढाकारातुन घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तात्याराव देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य स्वप्नील सरनाईक, माजी मुख्याध्यापक रामचंद्र जाधव, मुख्याध्यापक गजानन बानोरे, मुख्याध्यापक बोरकर, संजय सरनाईक, रामदास पौळकर, बबन आल्हाट, डिगांबर गुºहाळकर, प्रभाकर सरनाईक, हिंमतराव सरनाईक, सिताराम जाधव, सै. आसद सै. यासिन, एन.डी. सरनाईक, संतोष मुंदडा, अनंता लांभाडे, नागेश गव्हाळे, उत्तम वाणी, डॉ. बालासाहेब कालापाड उपस्थित होते. सर्वप्रथम व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. जि.प. शाळेच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात शिक्षक कालापाड यांनी सांगीतले की, दानशूर व्यक्तीमत्व संतोष मुंदडा यांच्याकडून दरवर्षी अनेक शाळेतील होतकरु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, पुस्तकांचे वाटप करण्यात येते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दोन्ही शाळेतील अनेक होतकरु विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना माजी मुख्याध्यापक रामचंद्र जाधव म्हणाले की, संतोष मुंदडा यांचा हा उपक्रम फारच चांगला असून इतर व्यक्तींनी सुध्दा मुंदडा यांच्याकडून प्रेरणा घेवून असे उपक्रम राबवावे. या कार्यक्रमात जि.प. शाळेतील शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, भा.मा. शाळा चिंचांबापेन येथील विद्यार्थी, पेंडगाव येथील गावकरी मंंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन के.के. कालापाड यांनी तर आभार शिक्षक शिंदे यांनी मानले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.