स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:44 AM2021-07-28T04:44:10+5:302021-07-28T04:44:10+5:30
धनज बु......विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये याकरिता गावातील एका शिक्षकाने स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. कोरोना संसर्गाला आळा ...
धनज बु......विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये याकरिता गावातील एका शिक्षकाने स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना पुढे आली. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम ग्रामीण भागातील शिक्षकांकडून राबविला जात आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत. यायच एक भाग म्हणून म्हसला येथील सुधाकर बनारसे या शिक्षण येथील प्राथमिक शाळेतील पंचवीस विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये पुस्तके, पेन ,पेन्सिल, वही, शालेय पोषक साहित्याचा समावेश आहे.
बनारसे यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना घरीच राहून शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.