कारखेडा येथे मोफत धान्याचे वाटप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:06+5:302021-05-09T04:42:06+5:30
कारखेडा येथे रास्त धान्य दुकानदारांकडून शासकीय नियमाप्रमाणे प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक, अंत्योदय कार्डधारक आणि दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्य ...
कारखेडा येथे रास्त धान्य दुकानदारांकडून शासकीय नियमाप्रमाणे प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक, अंत्योदय कार्डधारक आणि दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबातील नागरिकांना मोफत धान्य आपदात्मक त्रिसूत्रीचे पालन करून करण्यात येत आहे. कोरोनामुळे गाव, तांड्यातील नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत असल्याचे लक्षात घेऊन, राज्य शासनाने प्राधान्य कुटुंब, अंत्योदय शिधापत्रिकाधारक आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत धान्याचे वितरण करणे सुरू केले आहे. त्यानुसार, अधिकृत शासकीय रास्त धान्य दुकानदारांमार्फत अंत्योदय कार्डधारकांना १५ किलो गहू व २० किलो तांदूळ, तसेच १ किलो चणाडाळ व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ व मानसी १ किलो चणाडाळ देण्यात येत आहे. धान्य वाटपाची प्रक्रिया सुरळीत सुरू असून, कुठेही गर्दी होत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.