मानोरा तालुक्यात १२० धान्य दुकानातून ई पॉश मशीनव्दारे धान्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:32 PM2017-11-04T14:32:40+5:302017-11-04T14:34:18+5:30
मानोरा : तालुक्यातील १२० शासकीय रास्तभाव धान्य दुकानातून शिधापत्रीकाधारकांना धान्याचे वितरण बायोमेट्रीक प्रणाली म्हणजेच ई पॉश मशिनच्या आधारे वितरण करण्यात येत आहे .
मानोरा : तालुक्यातील १२० शासकीय रास्तभाव धान्य दुकानातून शिधापत्रीकाधारकांना धान्याचे वितरण बायोमेट्रीक प्रणाली म्हणजेच ई पॉश मशिनच्या आधारे वितरण करण्यात येत आहे . त्यामुळे वितरण धान्य प्रणालीत पारदर्शकता आली आहे तसेच बायोमेट्रीक प्रणालीव्दारे वितरीत केलेल्या धान्य वितरणाच्या मार्जीनमध्ये रास्त भाव परवानाधारकांना शासनाने प्रति क्विंटल १० रुपये वाढ केल्यामुळे परवानाधारक सुद्धा पॉस मशिनने शिधापत्रीकाधारकांना धान्याचे वितरण करीत आहे.
राज्य शासनाने गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या हक्काचे धान्य पोहचावे व सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी अन्नधान्य वितरण व्यवस्थेत बायोमेट्रीक प्रणालीच्या विलंब केला, त्यानुसार पहील्या टप्यात भारतीय अन्न मंडळाकडून धान्य उचालून त्याचे शासकीय गोदामापर्यंतच्या वाहतुकीचे सनियंत्रण करण्यात आले. त्यानंतर दुसºया टप्प्यात सर्व शिधावाटप कार्याल्यातील कामाचे संगणीकरण व लाभार्थी कुटूंबाला संगणीकृत शिधात्रीका देण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली कुटूंबातील वरिष्ठ महिलेच्या नावे संगणीकृत शिधापत्रीकेचे वितरण करण्यात आले यामध्ये कुटूंबातील सर्व व्यक्तींच्या आधार क्रमांकाचा समावेश करण्यात आला.
मानोरा तालुक्यात १२० रास्त भाव धान्य दुकान आहे. बायोमेट्रीक प्रणालीमध्ये लाभार्थी धान्य घेण्यासाठी शासकीय रास्त भाव धान्य दुकानात आल्यानंतर त्याला अंगठा पॉश मशीनवर ठेवून खात्री करावी लागते. अंगठाचा ठसा दिल्यावर लाभार्थीच्या संपूर्ण तपशिल पॉस मशिच्या स्क्रीनवर दिसतो . घ्यायची रक्कम, धान्य या बाबतची संपूर्ण तपशीलची पावती प्रिंट स्वरुपात मशिनमधून बाहेर पडते . सदर पावतीच्या आधारे रास्त भाव परवानाधारक धान्य वितरीत करतो अशा पद्धतीने ईपिडीएस व्यवहार होत असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येण्यास मदत होते. तालुक्यातील प्रत्येक शासकीय धान्य दुकानात अन्नधान्य विरतण सुरु झाले आहे. बायोमेट्रीक प्रणालीव्दारे म्हणजेच मशिनव्दारे वितरीत केले त्या धान्य वितरणाच्या मार्जिनमध्ये प्रति क्विंटल १० रुपये वाढ करण्यात आली आहे. पुर्वी हे मार्जीन केवळ प्रति क्विंटल ७० रुपये एवढे होते त्यात वाढ करुन ८० रुपये मार्जिनमधील वाढ ही केवळ बायोमेट्रीक पद्धतीने वितरीत होणाºया धान्य वितरणासाठीच लागू असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.