अनुदानावर हरभरा बियाणे परमिट वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:48 PM2017-10-13T19:48:00+5:302017-10-13T19:48:44+5:30
तलाठी कार्यालयामध्ये बुधवारी वाशीम तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाकरीता लागणाºया हरभरा बियाणे परमिटचे वाटप करण्यात आले़ सोयाबीन पिकाची सोंगणी व मळणी झाल्यानंतर ज्या शेतकºयांकडून रब्बीतील हरभरा पीक पेरण्यास प्राधनय दिल्या जात आ
लोकमत न्यूज नेटवर्क
अनसिंग : येथील तलाठी कार्यालयामध्ये बुधवारी वाशीम तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांना रब्बी हंगामाकरीता लागणाºया हरभरा बियाणे परमिटचे वाटप करण्यात आले़ सोयाबीन पिकाची सोंगणी व मळणी झाल्यानंतर ज्या शेतकºयांकडून रब्बीतील हरभरा पीक पेरण्यास प्राधनय दिल्या जात आ़े त्यामुळे कृषी विभागाच्यावतीने दिल्या जाणारे हरभरा बियाणे अगदी पेरणीच्या कामी पडत असल्याच्या प्रतिक्रीया शेतकरी बांधवांमधून उमटल्या़ हरभरा बियाणे परमीट वाटप प्रसंगी कृषी सहाय्यक सुनील वाळूकर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सातव यांची उपस्थिती होती़ प्रसंगी अनसिंग येथील तलाठी व्ही़एस़दवणे़ तलाठी एस़डी़मारकड , तलाठी के़डी़धाकतोड, ग्रामसेवक बोडेखे यांची उपस्थिती होती