५३३ गावांतील ७९१८ शेतकऱ्यांना घरपाेहोच खते, बियाणांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:57+5:302021-06-01T04:30:57+5:30

कृषी विभागाने दिलेल्या लिंकवर जाऊन शेतकरी बंधूंनी आवश्यक असलेली खते व बियाणांची नोंद करावी असे आवाहन करण्यात आले हाेते, ...

Distribution of home fertilizers and seeds to 7918 farmers in 533 villages | ५३३ गावांतील ७९१८ शेतकऱ्यांना घरपाेहोच खते, बियाणांचे वाटप

५३३ गावांतील ७९१८ शेतकऱ्यांना घरपाेहोच खते, बियाणांचे वाटप

Next

कृषी विभागाने दिलेल्या लिंकवर जाऊन शेतकरी बंधूंनी आवश्यक असलेली खते व बियाणांची नोंद करावी असे आवाहन करण्यात आले हाेते, त्यानुसार घरपोहोच खते, बी-बियाणे देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यात बियाणे व खतांची मागणी करणाऱ्यांमध्ये ६७१ गट व ७९१८ शेतकऱ्यांचा समावेश हाेता. या मागणीनुसार कृषी विभागाच्या वतीने ४०४२.८१५ क्विंटल बियाणांचे वाटप करण्यात आले. यामध्ये ३८५९.८ साेयाबीन बॅग , १८२.८८ सह कापूस बियाणांचा समावेश आहे. तसेच खतांची मागणी करणाऱ्यांना शेतावर, बांधावर घरपाेहोच वाटप करण्यात आले. यामध्ये डीएपी ५० किलाेच्या बॅगचे १०२०२ , युरिया १९६८, एमओपी ४८१ ,एसएसपी ३५२५, काॅम्प्लेक्स फेरती १९२१९ आदी १७६९ मेट्रिक खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

.......................

काेराेना संसर्ग पाहता कृषी विभागाकडून नाेंदणी केलेल्या गटांना, शेतकऱ्यांना घरपाेहोच खते व बियाणे पुरवठा करण्यात आला. यामध्ये नाेंदणी करण्यात आलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार पुरवठा करण्यात आला आहे.

- शंकरराव ताेटावार, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, वाशिम

..........................

बियाणे, खते मागणी नाेंदविण्यात आलेली तालुकानिहाय गावे, गट, शेतकरी

बियाणे, खते मागणी नाेंदविण्यात आलेली तालुकानिहाय गावे, गट, शेतकरी

गावे : ४६

गट : ४८

शेतकरी : १४७०

रिसाेड

७५

२१

३५४

मालेगाव

११४

७४

२८९

मंगरुळ

८७

७८

९३२

मानाेरा

७६

१२

२६३

कारंजा

१३५

४३८

४६१०

...............वाशिम

गावे : ४६

गट : ४८

शेतकरी : १४७०

रिसाेड

७५

२१

३५४

मालेगाव

११४

७४

२८९

मंगरुळ

८७

७८

९३२

मानाेरा

७६

१२

२६३

कारंजा

१३५

४३८

४६१०

...............

Web Title: Distribution of home fertilizers and seeds to 7918 farmers in 533 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.