रिसोड तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांना एलईडी संच वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 04:05 PM2019-08-14T16:05:46+5:302019-08-14T16:05:52+5:30
समता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत एकूण २७ शाळांना मोफत एलईडी संच व अन्य शैक्षणिक साहित्य वाटप केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड तालुक्यातील २७ जिल्हा परिषद शाळांना १३ आॅगस्ट रोजी समता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्यावतीने २७ एलईडी संच व अन्य शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले.
स्थानिक उत्तमचंद बगडीया कला व वाणिज्य महाविद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता फाऊंडेशनचे विश्वस्त उत्तमचंद बगडीया, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य विजयराव तुरूकमाने, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, गटविकास अधिकारी शरद कोकाटे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, गटशिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे, पोलीस उपनिरीक्षक नेमणार, सरव्यवस्थापक विठ्ठलराव बसू, मुख्याध्यापक अरूण मगर आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळांना संगणकाची जोड देण्यासाठी समता फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेत एकूण २७ शाळांना मोफत एलईडी संच व अन्य शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी उत्तमचंद बगडीया, अंबादास मानकर यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन गजानन पाचरणे यांनी तर आभार अर्जुन वरघट यांनी मानले.