मेळघाट, गडचिरोली, चंद्रपुर भागात आदिवासी बांधवांना साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 03:26 PM2018-10-03T15:26:25+5:302018-10-03T15:27:44+5:30
वाशिम - तरुण क्रांती मंच, जानकीनगर येथील बाल गणेश मंडळाच्यावतीने मेळघाट, गडचिरोली, चंद्रपुर जिल्हयातील अतिदुर्गम भागातील आदिवासी, गरजवंतांना कपडे, धान्य, बिस्कीटे, ब्लँकेट, पादत्राणे आदींचे वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - तरुण क्रांती मंच, जानकीनगर येथील बाल गणेश मंडळाच्यावतीने मेळघाट, गडचिरोली, चंद्रपुर जिल्हयातील अतिदुर्गम भागातील आदिवासी, गरजवंतांना कपडे, धान्य, बिस्कीटे, ब्लँकेट, पादत्राणे आदींचे वितरण करण्यात आले.
मेळघाट येथील सिमाडोह परिसरासोबत चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम, लेंडारी, येडापुर, कुरखेडा, दवंडी, कोहोका आदी गावातील आदिवासी महिला, पुरूष व बालकांना साडी, कपडे, धान्य, बिस्कीट, पादत्राणे, शाल, ब्लँकेट, बिस्कीट आदीचे वितरण करण्यात आले. ब्रम्हपुरी येथे माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुर, गडचिरोली जिल्हयात या वाटप साहित्याला हिरवी झेंडी दिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह माजी मंत्री शोभा फडणवीस, प्रा. महेश पानसे आदींची उपस्थिती होती. सामाजिक बांधीलकी म्हणून या प्रकल्पाचे संयोजक तथा तरूण क्रांती मंचचे निलेश सोमाणी व अॅड. भारती सोमाणी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाकरीता समस्त जानकीनगर येथील महिला भगिनी, बाल गणेश मंडळ पदाधिकारी, सुरेश दहात्रे, कैलास दहात्रे, माळीराज गणेश मंडळाचे पदाधिकारी, समाजसेवी नितीन उलेमाले, रमेशचंद्र लढ्ढा, डॉक्टर मंडळी आदींनी सहकार्य केले. गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयात मदतीचे वाटप नीलेश सोमाणी, प्रा. कृष्णकुमार लाहोटी, बंडू राठोड, सुनिल फुलारी, जाधव, अबरार आदींनी केले.