नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:46+5:302021-07-17T04:30:46+5:30

-------- कामरगाव येथील बाजारपेठेत शुकशुकाट वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली लागू केली. त्यात कामरगाव येथे ...

Distribution of masks and sanitizers to the citizens | नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप

googlenewsNext

--------

कामरगाव येथील बाजारपेठेत शुकशुकाट

वाशिम : शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने नवी नियमावली लागू केली. त्यात कामरगाव येथे सायंकाळी ४ पूर्वीच अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्यत्र सर्व दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला.

-----------------

कामरगाव परिसरात अनियमित वीजपुरवठा

वाशिम : कोेरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी लागू नियमांमुळे ग्रामस्थांना सायंकाळपासून घरात थांबावे लागत आहे. त्यात कारपा परिसरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ उकाड्याने हैराण झाले आहेत.

--------------

आरोग्य केंद्रात औषधसाठा उपलब्ध

वाशिम : सर्दी, ताप, खोकला व अन्य साथरोग लक्षात घेता, जिह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक ती औषधी उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापतींनी सोमवार १६ जुलै रोजी दिली.

-------

मोहरी प्रकल्पाच्या पातळीत वाढ

वाशिम: मोहरी येथील लघू प्रकल्पाने यंदाच्या उन्हाळ्यात तळ गाठला होता. यामुळे परिसरातील जलस्रोताची पातळी खालावली होती. आता दमदार पाऊस पडत असल्याने, या प्रकल्पातील साठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे शुक्रवारी दिसून आले.

--------

स्वस्त धान्य वितरणात दक्षता

वाशिम: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचे पालन आवश्यक असल्याने, लाभार्थींना रेशन दुकानातून मोफत स्वस्त धान्य वितरण करताना फिजिकल डिस्टन्सिंग इतर दक्षता घेतली जात आहे.

Web Title: Distribution of masks and sanitizers to the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.