मेेडशी आराेग्य वर्धिनी केंद्र, अंगणवाडी केंद्रास साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:08+5:302021-06-19T04:27:08+5:30
आरोग्य वर्धिनी केंद्र, अंगणवाडी केंद्रात साहित्य वाटप केल्यानंतर आमदार अमित झनक यांनी मेडशी येथील लसीकरण केंद्रास भेट दिली. मेडशी ...
आरोग्य वर्धिनी केंद्र, अंगणवाडी केंद्रात साहित्य वाटप केल्यानंतर आमदार अमित झनक यांनी मेडशी येथील लसीकरण केंद्रास भेट दिली. मेडशी ग्रामपंचायत कार्यालयात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करून लसीकरण करणे सुरू आहे. यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांची नोंदणी सुरु आहे. यावेळी जि.प. अध्यक्ष डॉ. शाम गाभने, माजी सभापती शेख गनीभाई, सरपंच शेख जमीर, माजी सरपंच डॉ. सुभाष मंत्री, जि. प. सदस्य लक्ष्मी प्रदीप तायडे, पं. स. सदस्य कौशल्याबाई रामभाऊ साठे, माजी उपसरपंच शेख रज्जाकभाई शेख चांदभाई, माजी पं. स. सदस्य प्रदीप तायडे, गजानन शिंदे, ग्रा. पं. उपसरपंच धीरज मंत्री ,माजी सरपंच रमजानभाई गवरे, सचिव मोहन वानखडे, ग्रा.पं. सदस्य मूलचंद चव्हाण, शांताबाई प्रकाश तायडे, जगदीश राठोड , संध्याबाई भगवानराव घुगे, मीराबाई ज्ञानेश्वर मुंडे ,गजानन झ्याटे, अमोल तायडे, सुभाष तायडे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे, शौकतभाई पठाण, माजी ग्रा.पं. सदस्य मधुकर बहादुरे, सत्येंद्र जैन, शेख रफीक,खंनुभाई गवरे, संदीप घुगे, संजय भागवत, धनराज चव्हाण, ग्रा.पं. कर्मचारी बाळू घुगे, मुकेश चव्हाण, सर्वेश खंडेलवाल, वामन साठे, शेख इरफान , ओंकार भागवत आदींची उपस्थिती होती.