७५ टक्के अनुदानावर होणार दुधाळ जनावरांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:50 PM2018-07-20T17:50:47+5:302018-07-20T17:51:52+5:30

वाशिम -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१८-१९ या वर्षामध्ये ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप केले जाणार असून, यासाठी पात्र लाभार्थींकडून २० जुलैपासून प्रस्ताव मागविण्यास सुरूवात झाली.

Distribution of milk animals to 75% subsidy | ७५ टक्के अनुदानावर होणार दुधाळ जनावरांचे वाटप

७५ टक्के अनुदानावर होणार दुधाळ जनावरांचे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ जनावरांचे वितरण केले  जाणार आहे.  निवड झाल्यास एका महिन्याचे आत २१ हजार २६५ रुपये लाभार्थी हिस्सा चलॉनव्दारे भरावा लागणार आहे. प्रथम एका महिन्यात व दुसरे दुधाळ जनावर ६ महिन्यानंतर राज्याबाहेरील किंवा जिल्हा बाहेरील गुरांचे बाजारातून  खरेदी करुन देण्यात येतील.

वाशिम -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१८-१९ या वर्षामध्ये ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप केले जाणार असून, यासाठी पात्र लाभार्थींकडून २० जुलैपासून प्रस्ताव मागविण्यास सुरूवात झाली. १९ आॅगस्टपर्यंत पात्र लाभार्थींना स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती स्तरावरील पशुसंवर्धन विभागाकडे सादर करावे लागणार आहेत.
विशेष घटक योजनेंतर्गत अनु.जाती, नवबौद्ध घटकातील  लाभार्थी तसेच आदिवासी उपयोजनांतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ जनावरांचे वितरण केले  जाणार आहे. लाभार्थी  निवड झाल्यास एका महिन्याचे आत २१ हजार २६५ रुपये लाभार्थी हिस्सा चलॉनव्दारे भरावा लागणार आहे. या योजनेत अनुदान प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थींना प्रथम एका महिन्यात व दुसरे दुधाळ जनावर ६ महिन्यानंतर राज्याबाहेरील किंवा जिल्हा बाहेरील गुरांचे बाजारातून  खरेदी करुन देण्यात येतील. विशेष घटक योजनेंतर्गत अनु.जाती, नवबौध्द लाभार्थी व आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थींना ७५ टक्के अनुदानावर शेळी गटाचा पुरवठा केला जाणार आहे. लाभार्थीची निवड झाल्यास एक महिन्याचे आत उस्मानाबाद संगमनेरी जातीसाठी १७ हजार ८१० रुपये व स्थानिक जातीसाठी ११ हजार ९६२ रुपये लाभार्थी हिस्सा चलॉनदरे भरावा लागणार आहे. या सर्व योजनांचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध आहेत. सदर प्रस्ताव १९ आॅगस्टपर्यंत स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती स्तरावरील पशुसंवर्धन विभागाकडे सादर करावे असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप व प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.जे.पी.केंद्रे यांनी केले.

Web Title: Distribution of milk animals to 75% subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.