४0६ अंगणवाडी केंद्रांत पोषण आहार वाटप ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:58 AM2017-09-26T01:58:36+5:302017-09-26T01:59:42+5:30
वाशिम: अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गतच्या पोषण आहारात खंड पडू नये म्हणून स्थानिक पातळीवर ६७0 ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली तर अद्याप ४0६ अंगणवाड्यातील पोषण आहार वाटप ठप्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गतच्या पोषण आहारात खंड पडू नये म्हणून स्थानिक पातळीवर ६७0 ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली तर अद्याप ४0६ अंगणवाड्यातील पोषण आहार वाटप ठप्प आहे.
वाशिम जिल्हय़ात १,0७६ अंगणवाडी केंद्र असून, तेवढय़ाच अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात वाशिम जिल्हय़ातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे सुरुवातीला वाशिम तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित पाचही तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना कुलूप लागले होते तसेच बालकांचा पोषण आहारदेखील ठप्प होता. सं पामुळे कुपोषित बालके व अंगणवाडीतील पोषण आहाराचे लाभार्थी बाधित होऊ नये तसेच आहार पुरवठय़ात खंड पडू नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना महिला व बाल विकास विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाला १३ सप्टेंबरला केल्या होत्या. स्थानिक पातळीवरील शासकीय यंत्रणेतील कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सहायक, आरोग्य सहाय्यिका, ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक शाळेचे शिक्षक, ग्राम शिक्षण समितीच्या सहाय्याने तसेच स्थानिक गरम ताजा आहार पुरविणारे महिला बचत गट आदींच्या माध्यमातून पर्यायी व्यवस् था करावी आणि पोषण आहाराचे वाटप पूर्ववत करावे, अशा सूचना देण्यात मिळाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी महिला व बालकल्याण विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले. महिला व बालकल्याण विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. इंगळे व बाल विकास प्रकल्प अधिकार्यांनी बचत गट, आशा व सेविकांच्या माध्यमा तून जिल्हय़ातील ६७0 अंगणवाडी केंद्रांत पोषण आहार वाट पाची पर्यायी व्यवस्था केली आहे. उर्वरित ४0६ अंगणवाडी केंद्रांत तूर्तास पर्यायी व्यवस्था नसल्याने पोषण आहार वाटप ठप्प आहे. या अंगणवाडी केंद्रांना कुलूप लागलेले आहे. जिल्हय़ा तील सर्वच अंगणवाडी केंद्रांत लवकरच पोषण आहार वाटपाची पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे इंगळे यांनी सांगितले.